Paytm यूजर्ससाठी मोठी बातमी! व्यापार्यांना वॉलेट, UPI, RuPay द्वारे पैसे घेतल्यास द्यावे लागणार नाही शुल्क
नवी दिल्ली : फानान्शियल टेक्नॉलॉजी कंपनी पेटीएमने व्यापार्यांसाठी खास भेट दिली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, आता पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा रूपे कार्डद्वारे पैसे घेतल्यास व्यापर्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. सोबतच यासाठी पैसे घेण्यासाठी कोणतीही सीमा सुद्धा ठरवण्यात आलेली नाही. सोप्या शब्दात सांगायचे तर आता पेटीएमचा वापर करणारे व्यापारी ग्राहकांकडून कितीतीही पैसे कोणत्याही चार्जशिवाय घेऊ शकतील. कंपनीनुसार, यामुळे व्यापार्यांना वार्षिक सहाशे कोटी रूपयांचा थेट फायदा होईल. यामुळे व्यापार्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य भांडवल सुद्धा उपलग्ध होईल.
ऑल इन वन क्यूआर करा अपडेट
व्यापार्यांना विना चार्ज पैसे घेण्यासाठी पेटीएम ऑल इन वन क्यूआरमध्ये अपग्रेड करावे लागेल. तसेच या ऑफरमुळे रिवॉर्ड पॉईंट कमावण्याची संधी आणि ऑफरसुद्धा मिळतील. पेटीएमने म्हटले आहे की, त्यांचे लक्ष्य 1.7 कोटी व्यापार्यांना फायदा पोहचवणे आहे.
कंपनीने म्हटले, व्यापार्यांना पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय किंवा अन्य कोणत्याही यूपीआय अॅपद्वारे पैसे मंजूर करण्यासाठी एक पेटीएम ऑल इन वन क्यूआरची गरज असेल. ऑल इन वन क्यूआरच्या मदतीने व्यापारी कोणतेही बँक खाते किंवा रूपे कार्डसह पेटीएम वॉलेटद्वारे कंपनीकडून झीरो चार्जवर पैसे घेऊ शकतात.
व्यापार्यांना कर्जसुद्धा उपलब्ध
कंपनीचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट कुमार आदित्य यांनी म्हटले की, आम्ही पेटीएमशी संबंधीत व्यापार्यांना आपला बिझनेस वाढवण्यासाठी योग्य पैसा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. याशिवाय पेटीएम एमएसएमईला आर्थिक मदत सुद्धा करत आहे. आशा आहे की, मार्च 2021 पर्यंत कंपनी 1,000 कोटी रूपये कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण करेल. कंपनी मर्चंट लेंडिंग प्रोग्राम अंतर्गत व्यापार्यांना विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून देत आहे. सोबतच सर्व पेटीएम यूजर्ससाठी वॉलेटमधून बँक ट्रान्सफर मोफत आहे.