PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्यांदा घेऊ शकतील अॅडव्हान्स
नवी दिल्ली : वृत्त संस्था – PF Account | कोरोना काळात लोकांची समस्या पाहता ईपीएफओने दुसर्यांदा लोकांना त्यांच्या पीएफ अकाऊंट (PF Account) मधून अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा प्रदान केली आहे. मागील वर्षी सुद्धा ईपीएफओने आपल्या सबस्क्रायबर्सला महामारीमुळे आकस्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली होती. आता तुम्ही आपल्या पीएफ अकाऊंटमधून दुसर्यांदा नॉन-रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्सचा लाभ घेऊ शकता.
आदेशानुसार, पीएफ सबस्क्रायबर्सला तीन महिन्याची मुळ सॅलरी (बेसिक सॅलरी+महागाई भत्ता म्हणजे डीए) किंवा त्याच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंत रक्कम (जे कमी असेल) काढण्याची परवानगी दिली आहे, ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नाही. कमी रक्कमेसाठी सुद्धा अप्लाय करता येईल.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
या लोकांना सुद्धा मिळेल लाभ
कामगार मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान आपल्या सबस्क्रायबर्सला मदत करण्यासाठी ईपीएफओने आपल्या सदस्यांना दुसर्यांदा कोविड-19 अॅडव्हान्स घेण्याची परवानगी दिली आहे, जे परत करायचे नाहीत. ज्या लोकांनी मागच्या वर्षी आपल्या पीएफ अकाऊंटमधून अगोदरच अॅडव्हान्स घेतले आहे, ते सुद्धा या नवीन ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
अशा प्रकारे काढा पीएफ अॅडव्हान्स
1.ईपीएफओचे युनिफाईड पोर्टल (https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface) च्या मेंबर इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
2.आता ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये जाऊन आणि क्लेम (फॉर्म-31,19,10सी, 10डी) वर क्लिक करा.
3. आपल्या बँक अकाऊंटचे शेवटचे चार अंक टाका आणि व्हेरिफाय करा.
4. नंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
5. आता आऊटब्रेक ऑफ पेंडेमिक (कोविड-19) सिलेक्ट करा.
6. जेवढ्या रक्कमेची गरज आहे, ती टाका.
7.आता बँक अकाऊंटच्या चेकीची स्कॅन कॉपी अपलोड करा.
8.Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाका.
9. अशाप्रकारे तुमचा क्लेम सबमिट होईल आणि 3 दिवसांच्या आत बँक अकाऊंटमध्ये पैसे क्रडिट केले जातील.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
Web Title : PF Account |big news for pf account holders epf members can now avail second covid 19 advance
17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार