पीएफ (PF) खातेदारांसाठी मोठी बातमी ; ‘हे’ अपडेट केलं नाही तर पैसे काढताना प्रचंड ‘अडचण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रोविडंट फंड आवश्यक असतो, लोक आवश्यक वेळी प्रोविडंड फंडातील पैसे वापरतात. परंतू तुम्ही आपल्या पीएफ अकाऊंट मध्ये काही चूक तर करत नाहीत ना हे कसे लक्षात येईल किंवा आपले केवायसी बरोबर आहे का हे कसे लक्षात येईल. हे पाहण्यासाठी तु्म्ही ऑनलाइन ईपीएफओचा वापर करु शकतात. हे पाहताना आपले पीफ अकाऊंट, आधारकार्ड वरील नाव आणि जन्मतिथी बरोबर आहे की नाही याकडे नक्की लक्ष द्या, कारण जर असे असेल तर भविष्यात पैसे काढताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

ऑनलाइन भर आपले डिटेल्स
कारण जर तुम्ही दिलेली महिती बरोबर नसेल तर तुम्ही पीएफ काढण्यासाठी केलेला क्लेम सेटल होऊ शकत नाही, आणि रिटायरमेंट वेळी पीेएफ काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. म्हणून याकडे लक्ष दिले तर ही समस्या ऑनलाइनच सुटू शकते, कारण यात तुम्हीच तुमच्या डिटेल भरू शकतात आणि त्या डिटेल अपडेट करु शकतात. यात तुम्ही दिलेल्या माहितीत सुधारणा देखील करु शकतात. याआधी ही प्रक्रिया खूपच गुंतागूंतीची होती, म्हणूनच ईपोएफओने वेळ आणि पेपरवर्क वाचवण्यासाठी ही ऑनलाइनची रिक्वेस्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही रिक्वेस्ट मिळाल्यानंतर सिस्टीम याची तुलना UIDAI डाटाशी करते. यानंतर ईपीएफओ आधिकारी रिक्वेस्टला व्हेरिफाय करतो आणि सुधारणा आणि बदल करण्याचा प्रक्रियेला परवाणगी मिळते.

असे करु शकतात तुम्ही बदल
सर्वात आधी ईपीएफओच्या संंकेतस्थळावर जाऊन त्यात UAN आणि पासवर्ड टाकून ते लॉगिन करा, त्यावर Modify Besic Detail सिलेक्ट करा. जर आधार कार्ड व्हेरिफाय असेल तर मात्र तुम्हाला डिटेल्स भरता येत नाही. त्यानंतर योग्य ते डिटेल्स भरा आणि आधार सिस्टीमसोबत डाटा व्हेरिफाय करा. हे डीटेल्स भरल्यानंतर update detail वर क्लिक करा, त्यानंतर ही माहिती अप्रुवलसाठी पाठवण्यात येईल.

आरोग्य विषयक वृत्त

‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम