खुशखबर ! 6.3 लाख EPF खातेदारांना होळीपुर्वीच मिळणार ‘गिफ्ट’, ‘या’ अटीवर मिळणार जास्तीचं पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कामगार मंत्रालयाने 20 फेब्रुवारी, 2020 ला एका अधिसूचनेत म्हटले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेंतर्गत त्या पेन्शन धारकांना जास्त पेन्शन मिळेल, ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर 15 वर्षानंतर पूर्ण पेन्शन मिळण्याच्या सुविधेचा पर्याय निवडला आहे. हा नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी आपल्या पेन्शनचा काही भाग कमी केला. कामगार मंत्रालयाने म्हटले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन फंडातून एकमापी आंशिक पैसे काढणे म्हणजे कम्युटेशनची सुविधा आता प्राप्त करू शकतील.

काय आहे अगाऊ निवृत्ती वेतनाची योजना
या सुविधेंतर्गत पेन्शनधारकाला पेन्शचा एक हिस्सा अगाऊ देण्यात येतो. यानंतर पुढल्या 15 वर्षांसाठी त्याच्या मासिक पेन्शनमधून एक तृतियांश कपात केली जाते. 15 वर्षानंतर पेंशनधारक पूर्ण पेन्शन घेण्यास पात्र होतात.

6.3 लाख पेन्शनधारकांसाठी प्रस्तावाला मंजूरी
ईपीएफओचा निर्णय घेणार्‍या प्रमुख केंद्रीय विश्वस्त मंडळाने 21 ऑगस्ट 2019 ला झालेल्या बैठकीत या सुविधेचा लाभ घेणार्‍या 6.3 लाख पेंशनधारकांना कम्युटेशन तरतूद देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. केंद्रीय विश्वस्त बोर्डाचे अध्यक्ष कामगार मंत्री आहेत.

ईपीएफओच्या एका समितीने आंशिक पैसे काढल्यानंतर 15 वर्षानंतर पेन्शनची रक्कम देण्यासंबंधी ईपीएफसी 95 मध्ये दुरूस्तीची शिफारस केली होती. पेन्शन कम्युटेशन देण्याबाबत मागणी केली होती. यापूर्वी, ईपीएफसी 95 सदस्यांना 10 वर्षांसाठी पेन्शन मध्येच एक तृतियांश रक्कम काढण्याची परवानगी होती. ही 15 वर्षानंतर करण्यात आली आहे. ही सुविधा सरकारी कर्मचार्‍यांसाठी पूर्वीपासूनच आहे.

काय आहे ईपीएफ?
एम्प्लॉइज प्रॉव्हिडन्ट फंड (ईपीएफ) सॅलरी घेणार्‍या कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा देणारी स्कीम आहे, जी एम्प्लॉइज प्रॉव्हिडन्ट फंड ऑर्गनायजेशनद्वारे चालवण्यात येते. याचे व्याज दर सरकार ठरवते. प्रत्येक महिन्याला कंपनी सर्व कर्मचार्‍यांच्या मुळ पगारातून 12 टक्के रक्कम कापून पीएफ खात्यात टाकते. कर्मचार्‍यांसोबत कंपनीकडूनही 12 टक्के पैसे त्या कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यात टाकले जातात.