SBI च्या ग्राहकांनी लक्षात ठेवावं ! 10 दिवसात बँकेनं बदलले 10 मोठे नियम, 42 कोटी खातेदारांवर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान एसबीआयने 6 मोठे नियम बदल केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना एक प्रकारे ग्राहकांना फायदा होईल आणि दुसरीकडे काही नुकसानही सहन करावे लागेल.

जाणून घ्या खातेदारांवर थेट परिणाम करणाऱ्या नवीन नियमांबद्दल –

गृह कर्ज-वाहन कर्ज स्वस्त –

गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त करून एसबीआयने ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. एसबीआयने सर्व मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे . बँकेने व्याजदर आणि ईएमआयवर सलग सहाव्या वेळेस कपात केली आहे. नवीन दर 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

EMI सुविधा –

बँकेने डेबिट कार्डवर आपल्या ग्राहकांना ईएमआय सुविधा दिली आहे. बँकेने नवीन डेबिट कार्ड आणले आहे, ज्यामध्ये ग्राहकांना ईएमआय सेवा मिळते. एसबीआयच्या डेबिट कार्डाद्वारे खरेदी करून तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे भरू शकता. आपण किमान 6 महिन्यांपासून 18 महिन्यांच्या ईएमआय कालावधीसाठी निवड करू शकता.

एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले –

बँकेने एटीएममधून कॅश काढून घेण्याचे नियम बदलले. 1 ऑक्टोबरपासून बँकेने एसबीआयचा एटीएम शुल्कही बदलले आहे. एसबीआय खातेधारकांना मेट्रो शहरांमधील एसबीआय एटीएममधून जास्तीत जास्त 10 वेळा मोफत डेबिट ट्रांजेक्शन ची सूट मिळेल, त्यानंतर शुल्क आकारले जाईल. यापूर्वी ही मर्यादा केवळ 6 पट होती. इतर शहरांमध्ये ही सूट 12 पट आहे.

व्याज दर कमी केले –

एसबीआयने व्याज दरातही कपात केली आहे. एसबीआयने बचत बँकेच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली असून यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला. आता बॅंकेने ठेवीधारकांचे व्याज दर 3.50 टक्क्यांवरून 3.25 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत. त्याचबरोबर, एक ते दोन वर्षांच्या मुदतीच्या ठेवी (FD ) आणि मोठ्या प्रमाणात मुदतीच्या ठेवीवरील व्याजही कमी केले आहे.

बँकेत जाम आणि पैसे काढण्याचे नियम –

1 ऑक्टोबरपासून बँकेत पैसे जमा आणि पैसे काढण्याचे नियमही बँकेने बदलले आहेत. बँकेच्या परिपत्रकानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर आपण एका महिन्यात आपल्या खात्यात केवळ 3 वेळा विनामूल्य जमा करू शकाल. यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर जीएसटी शुल्कासह 50 रुपये द्यावे लागतील.

पैसे काढण्याचे नियम बदलले

आता ग्राहक खात्यातून वारंवार पैसे काढू शकत नाही. बँक खात्यात जमा पैसे काढण्याचीही मर्यादा आहे. खातेदार महिन्यातून तीनदा त्यांच्या खात्यात विनामूल्य रोख जमा करू शकतात. त्याच वेळी आपण बँक शाखेतून 2 वेळा पैसे काढू शकता. 1 ऑक्टोबर 2019 पासून सेवा शुल्क बदलले गेले आहेत. नवीन नियम अंमलात आल्यानंतर, बँकेने ती सर्वांपर्यंत पोहोचण्याकरिता वेबसाइट, सोशल मीडिया अकाऊंटवर टाकली आहे.

ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले-

एसबीआयने 1 ऑक्टोबरपासून बँकेत पैसे जमा करण्याचे नियम बदलले आहे. 1 ऑक्टोबरपासून बँक NEFT, RTGS,, मासिक किमान शिल्लक, विनामूल्य व्यवहार यासह 5 नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही तुमच्या खात्यात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर आता तुम्हाला त्याचा शुल्क भरावा लागेल.

जर कोणत्या ग्राहकानं महिन्यातून तीनदा पैसे जमा करणं आणि काढल्यास व्यवहार मोफत होणार आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 50 रुपये अधिक जीएसटी लागणार आहे. नवीन बदलानुसार जर एखादा ग्राहक एका महिन्यात तीनदा पैसे जमा करुन काढत असेल तर हा व्यवहार विनामूल्य असेल. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी ते 50 रुपये अधिक जीएसटी असेल.

 

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like