SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! आता स्टेट बँक ‘या’ सर्व्हिसेसवर वसूल करणार जास्त चार्ज, जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने बचत खाते धारकांसाठी अनेक प्रकारच्या बँकिंग सर्व्हिसवरील चार्जेस वाढवले आहेत. एसबीआयने सांगितले की, नवीन सर्व्हिस चार्जेस 1 जुलै 2021 पासून लागू होतील. बँकेनुसार, नवीन चार्जेस एटीएममधून पैसे काढणे, नवीन चेकबुक, पैसे ट्रान्सफर आणि इतर नॉन – फायनान्शियल ट्रान्जक्शनवर लागू होतील.
बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी सुद्धा चार्ज
एसबीआयने सांगितले की, चारवेळा एटीएममधून रोकड काढण्यास कोणतेही शुल्क लागणार नाही. यानंतर ब्रँच आणि एटीएममधून कुठूनही रोकड काढण्यासाठी चार्ज घेतला जाईल. ग्राहकांना ब्रँच किंवा एटीएमवर प्रत्येकवेळी रोकड काढण्यासाठी 15 रुपये भरावे लागतील. सोबतच जीएसटी सुद्धा वसूल केला जाईल.
चेकबुकचे शुल्क वाढवले
खातेधारकाला एका आर्थिक वर्षात 10 चेक लीफ मोफत दिले जातील. यानंतर 10 लीफच्या चेकबुकसाठी 40 रुपये, 25 लीफच्या चेकबुकसाठी 75 रुपये आणि जीएसटी वसूल केला जाईल. इमर्जन्सी चेकबुकच्या प्रकरणात 10 लीफसाठी 50 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. वरिष्ठ नागरिकांना चेकबुकच्या नवीन सर्व्हिस चार्जेसमध्ये सूट दिली आहे. एसबीआय आणि नॉन-एसबीआय ब्रँचवर बीएसबीडी खातेधारकांकडून करण्यात आलेल्या नॉन-फायनान्शियल ट्रान्जक्शनवर कोणतेही शुल्क लागणार नाही.