SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! बँकेच्या नवीन स्कीमव्दारे घर बसल्या स्वस्त करून घ्या आपला EMI

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज पुनर्रचना धोरण आणले आहे. कोविड -19 च्या प्रभावापासून बँकेच्या किरकोळ कर्जदारांना दिलासा देणे हा त्याचा हेतू आहे. कर्ज पुनर्रचना धोरण राबविण्यासाठी एसबीआयने सोमवारी ऑनलाइन पोर्टल सुरू केले. बँकेच्या पोर्टल https://bank.sbi/ किंवा https://sbi.co.in या लिंकद्वारे ग्राहक घरबसल्या माहित करु शकतील की, ऑटो लोनची पुनर्रचना मिळू शकते की नाही.

पुनर्रचनेची पात्रता जाणून घेण्यासाठी उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल
या पोर्टलच्या माध्यमातून गृहकर्ज, वाहन कर्जे या किरकोळ कर्जाची पुनर्रचना सहज करता येईल, असे एसबीआयने म्हटले आहे. ग्राहकांना कर्जाच्या पुनर्रचनेच्या पात्रतेबद्दल माहिती मिळवण्यासाठी केवळ त्यांच्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. आरबीआयच्या कर्ज पुनर्रचनेच्या फ्रेमवर्क अंतर्गत, ज्यांचे कर्ज खाते मानक श्रेणीत येते ते कर्ज पुनर्रचनेस पात्र आहेत. यामध्ये ते ग्राहक येतील, ज्यांनी 1 मार्च 2020 पर्यंत 30 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये चूक केली नाही. तसेच ज्यांच्या उत्पन्नांवर कोरोना संकटाचा परिणाम झाला आहे ते देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येतील.

पोर्टलद्वारे मोरेटोरियमची रिक्वेस्ट केली जाऊ शकते
स्टेट बँकेच्या या पोर्टलच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या कर्जाच्या मोरेटोरियमसाठी रिक्वेस्ट करू शकतील. याअंतर्गत, एक महिन्यापासून 24 महिन्यांसाठी मोरेटोरियमची रिक्वेस्ट केली जाऊ शकते. एवढेच नाही तर ग्राहक या पोर्टलद्वारे कर्ज दुरुस्तीचा कालावधी वाढविण्याची रिक्वेस्ट देखील करु शकतात. आरबीआयने बँकांना त्यांच्या वैयक्तिक ग्राहकांना कर्ज पुनर्रचना पर्याय देण्यास परवानगी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना 15 सप्टेंबर 2020 पर्यंत कर्ज पुनर्रचना योजना सुरू करण्यास सांगितले होते.

अशा प्रकारे आपण पोर्टलद्वारे आपल्या कर्जाची पुनर्रचना करु शकता

>> पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर एसबीआयच्या किरकोळ ग्राहकांना खाते क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.

>> ओटीपी प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर आणि काही आवश्यक माहिती टाकल्यानंतर ग्राहकास कर्जाच्या पुनर्रचनेबद्दल आपली पात्रता जाणून घेता येईल. त्याला एक रेफरन्स नंबरही मिळेल.

>> रेफरन्स नंबर 30 दिवसांपर्यंत वैध असेल. यावेळी ग्राहक आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँक शाखेला भेट देऊ शकतात.

>> शाखेत कागदपत्रांची पडताळणी व कागदपत्रांची अंमलबजावणी झाल्यानंतर कर्ज पुनर्रचनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.