प्राॅपर्टीचे व्यवहार करताना सावधान, ‘एवढ्या’ पैशांच्या देवाण-घेवाणीवर आयकर विभागाकडून बसू शकतो दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनमध्ये २० हजाराहून जास्त पैशांच्या देवाणघेवाणीवर बंदी आहे. तुम्ही २० हजारांपेक्षा जास्त कॅश ट्रॅन्झॅक्शन केलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्यावर आयटी ऍक्ट २१७ नुसार जास्त दंड आकारू शकते. २० हजारांपेक्षा जास्त कॅश ट्रॅन्झॅक्शन झालं तर तेवढ्या रकमेचा दंड पडू शकतो.

काय आहे नियम –

प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनमध्ये २० हजार रुपयांपेक्षा जास्त पैशांची देवाणघेवाण केली तर आयकर खात्याच्या नियमांचं पालन करावं लागेल. प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनच्या नियमानुसार, पैशात कर्ज देणं, अ‍ॅडव्हान्स देणं, डिपाॅझिट घेणं-देणं बेकायदेशीर आहे.

उदा.
इन्कम टॅक्सच्या नियमानुसार , तुम्ही घर खरेदी करताना २० हजाराहून जास्त देवाण-घेवाण करू शकत नाही. त्या नियमांचं पालन तुम्ही नाही केलंत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही दोषी सिद्ध झालात तर आयकर विभाग तुमच्याकडून मोठा दंड वसूल करू शकते.

इन्कम टॅक्सची कॅश ट्रॅन्झॅक्शन करणाऱ्यांना नोटीस –

प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनमधल्या नियमांनुसार कॅश ट्रॅन्झॅक्शन करणाऱ्यांना इन्कम टॅक्स विभागानं नोटिस पाठवायला सुरुवात केली आहे. जवळपास २७ हजार लोकांना ही नोटिस पाठवली जाणार आहे. इन्कम टॅक्स तपासणीत २६,८३० खटले समोर आले आहेत. दिल्लीत जवळजवळ २ हजार आणि हैदराबादमध्ये १७०० केसेस समोर आल्या आहेत. त्यामध्ये ७ हजार कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालं आहे.