कंगनाचा BMC वर आरोप, म्हणाली- ‘आर्किटेक्टना मिळतेय ‘ही’ धमकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना कोणत्यानाकोणत्या कारणाने बीएमसी आणि सरकारवर आरोप करताना पहायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वी बीएमसीने अनधिकृत बांधकाम केल्याचे सांगून तिच्या कार्यालयावर कारवाई केली होती. आता कंगनाने ट्विटच्या माध्यमातून आरोप केले आहेत की या घटनेला सहा महिने झाले असतानाही तिच्या कर्यालयाची डागडुजी करु शकलेली नाही. तिने आरोप केला आहे की बीएमसीच्या भितीपोटी कोणताच आर्किटेक्ट तिचे ऑफिस बनवण्यासाठी तयार नाही.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी बीएमसीच्या विरोधातील केस जिंकले आहे. आता मला एका आर्किटेक्टच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी फाईल सादर करण्याची गरज आहे. मात्र, कोणताच आर्किटेक्ट माझे काम करण्यास तयार नाही. ते सांगतात की, बीएमसीकडून धमकी मिळत आहे की, त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल. माझ्या ऑफिसवर बीएमसीची कारवाई करुन सहा महिने उलटले आहेत.

कांगनाने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, कोर्टाने बीएमसी मुल्यांकनकर्त्याला साइटचा दौरा करण्यासाठी सांगितला होता. पण ते कित्येक महिन्यानंतरही आमचे कॉल घेत नाहीत. त्यांनी मागील आठवड्यात दौरा केला त्यानंतर कोणताच प्रतिसाद दिला नाही. हे त्या सर्वांसाठी आहे जे विचारत आहेत की तुझे घर का ठीक करत नाही. प्रत्येक कोपऱ्यात पाऊस आणि मी त्याबद्दल खूप चिंतेत आहे.

कंगनाच्या वांद्रे येथील तिच्या नवीन कार्यालवर कारवाई करताना ज्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्या लोकांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याची धमकी कंगनाने दिली आहे. बीएमसीने सप्टेंबर 2020 मध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचे सांगत तिच्या कर्यालयावर कारवाई केली. तिच्या कर्यालयाचा काही भाग पाडला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्याने काम थांबवण्यात आले.