आधार कार्ड अपटेड करायचंय ? मग ही माहिती वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड न्यायालयाने सक्तीचे केले नसले तरी ते महत्वाच्या ओळखपत्रांविषयी एक आहे. आधार कार्डमध्ये जन्मतारखेबद्दल माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता तुमच्याकडे फक्त एकच संधी आहे.

जन्मतारीख दुरुस्ती संबंधी नियम –

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधारकार्डवर जन्मतारखेबद्दल माहिती चुकली असेल तर ती एकदाच दुरुस्त होऊ शकते. जन्मदाखल्याबद्दल UIDAI ने एक अट ठेवली आहे. आधारमध्ये असलेली जन्म तारीख आणि अपडेटसाठी दिलेली जन्मतारीख यात ३ वर्षांहून जास्त अंतर असता कामा नये. असं असेल तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द केलं जाईल. यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक आधार ऑफिसमध्येच जावं लागेल.

सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत नव्याने खाते उघडण्यासाठी, खासगी, सरकारी नोकरीत रूजू होताना तसेच शाळेत मुलांना दाखल करताना आधार कार्डची आग्रही मागणी केली जाते. यामुळे कुटुंबातील प्रत्येकास आधार कार्ड गरजेचे बनले आहे. नव्याने आधारसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, नाव, पत्त्यात दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने शहरातील बँका, पोस्ट कार्यालय, तहसील कार्यालयात केंद्रे सुरू केली आहेत.