चांगली बातमी ! ‘एम्स’च्या COVAXIN ट्रायलमध्ये सहभागी व्यक्तीत आढळली नाही कोणतीही रिअ‍ॅक्शन

नवी दिल्ली : देशात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणात आता भारतात तयार झालेल्या कोवॅक्सीन नावाच्या कोरोना वॅक्सीनबाबत मोठी बातमी आली आहे. कोरोनाची वॅक्सीनची एम्समध्ये सुरू असलेली ट्रायल चांगले रिजल्ट देत आहे. एम्समध्ये पहिल्या दिवशी 30 वर्षांच्या एका व्यक्तीला कोरोना वॅक्सीन देण्यात आली. वॅक्सीनेशन नंतर या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची रिअ‍ॅक्शन आढळली नाही. एम्समधील ट्रायलचे प्रिंसिपल इन्व्हेस्टिगेटर डॉक्टर संजय राय यांच्यानुसार कोरोना वॅक्सीनची ट्रायल सुरू झाली आहे आणि आम्ही आता वॅक्सीनच्या ट्रायलसाठी वॉलंटियर्सची संख्या आणखी वाढवणार आहोत.

कोरोना वॅक्सीनच्या ट्रायलसाठी आतापर्यंत 12 वॉलंटियर्सची निवड झाली आहे. या वॉलंटियर्सपैकी दोघांना शुक्रवारी वॅक्सीनच्या ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये एक वॉलंटियर वैयक्तिक कारणामुळे एम्समध्ये पोहचू शकला नाही. या कारणामुळे शुक्रवारी केवळ एकाच वॉलंटियरला वॅक्सीन देता आली.

एम्समधील ट्रायलचे प्रिंसिपल इन्व्हेस्टिगेटर डॉक्टर संजय राय यांच्यानुसार कोणत्याही वॅक्सीनचा पहिला फेज सुरक्षेच्या दृष्टीने खुप महत्वपूर्ण असतो. याच कारणामुळे वॅक्सीनेशनच्या दोन तासापर्यंत आम्ही रूग्णाचे हावभाव किंवा त्यास होणारा कोणताही त्रास यावर लक्ष ठेवतो. आम्ही कोरोनाची वॅक्सीन जेव्हा या व्यक्तीला दिली तेव्हा तो पूर्णपणे नॉर्मल दिसत होता. त्यास कोणताही त्रास जाणवला नाही. आम्ही ट्रायलच्या दोन तासानंतर त्यास सुटी दिली.

कोरोना वॅक्सीनची ट्रायल करून घेणार्‍या प्रत्येक वॉलंटियर्सला एक डायरी दिली आहे. या डायरीत त्यांना आपल्यामध्ये जाणवत असलेल्या कोणत्याही बदलाची किंवा त्रासाची नोंद करायची आहे. संजय राय यांनी सांगितले की, वॉलंटियर्सला फॉलोअपसाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. परंतु, या दरम्यान त्याच्यामध्ये काहीही त्रास असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला ते घेऊ शकतात. त्यांनी सांगितले की, एक टीम सतत या वॉलंटियर्सच्या संपर्कात राहील आणि त्यांच्याकडून सतत माहिती घेत राहील. आज सुद्धा चार लोकांना कोरोना वॅक्सीन देण्यात येईल.

15 ते 20 दिवसांचा असेल पहिला फेज
कोणत्याही वॅक्सीनचा पहिला ट्रायल फेज 15 ते 20 दिवसांचा असतो. वॅक्सीनेशननंतर या वॅक्सीनशी संबंधीत सर्व माहिती एथिक्स कमेटीला पाठवली जाईल. कमेटी वॅक्सीनच्या रिपोर्टचा रिव्ह्यू केल्यानंतरच या ट्रायलच्या दुसर्‍या फेजला मंजूरी देईल. संपूर्ण भारतात या वॅक्सीनच्या पहिल्या फेजच्या ट्रायलसाठी 100 वॉलंटियर्सची निवड केली आहे.