अ‍ॅपद्वारे लोन घेणार्‍यांसाठी मोठी बातमी ! RBI नं जारी केले नवे नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मोबाइल अ‍ॅपद्वारे लोन देणार्‍या फिनटेक कंपन्यांवर सक्ती करत आरबीआयने त्यांच्यावर अनेक नियम आणि अटी लावल्या आहेत. डिजिटल लोन सेवा अधिक पारदर्शक बनवण्यासाठी असे करण्यात आले आहे. या कंपन्यांबाबत अनेक तक्रारी आल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत. या तक्रारींमध्ये डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म (लोन अ‍ॅप) जास्त व्याज घेतात, वसूलीची कठोर पद्धत अवलंबतात आणि अन्य छळाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने डिजिटल लोन एजंटप्रमाणे काम कारणार्‍या अशाप्रकारच्या कंपन्यांच्या गडबडीवर बँका आणि नॉन-बँकिंग आर्थिक कंपन्यांना (एनबीएफसी) कडक सूचना दिल्या आहेत. यात म्हटले आहे की, असे डिजिटल प्लॅटफॉर्म जर काही फ्रॉड करतील तर त्यासाठी सुद्धा बँका आणि एनबीएफसीला जबाबदार धरले जाईल. रिझर्व्ह बँकेने यासाठी बँका आणि एनबीएफसीला नवे निर्देश जारी केले आहेत.

काय आहेत आरबीआयचे नवे निर्देश

*  आरबीआयने डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मसना निर्देश दिले आहेत की, आपल्या वेबसाइटवर त्यांनी दर्शवावे की ते कोणतीही बँक किंवा एनबीएफसीकडून कर्ज देत नाहीत.

*  बँका, एनबीएफसी आणि अशा डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मना सांगण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या वेबसाइटवर याबाबत ग्राहकांना पूर्ण माहिती द्यावी.

*  बँका आणि नॉन बँकिंग आर्थिक कंपन्यांना (एनबीएफसी) वेबसाइटवर आपल्या एजंटच्या नावाचा खुलासा करण्यास सांगितले आहे.

*  आरबीआयने पुढे म्हटले आहे की, कर्जाला मंजूरी मिळताच ताबडतोब कर्ज घेणार्‍याला बँक किंवा एनबीएफसीच्या लेटरहेडवर एक पत्र जारी करावे.

या कारणांमुळे कंपन्यांवर दाखल होत नाही केस

हे निर्देश देताना आरबीआयने म्हटले की, नेहमी डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म आपल्या बँक/ एनबीएफसीच्या नावाचा खुलासा न करता स्वत: कर्ज देत असल्याचे भासवतात. यामुळे ग्राहक नियमानुसार उपलब्ध ठिकाणांचा वापर करत आपली तक्रार दाखल करू शकत नाहीत.