ऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध, Pfizer चे CEO म्हणाले – ‘आमच्याकडे याबाबतचे सबळ पुरावे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेची मोठी औषध कंपनी फायजरचे सीईओ अल्बर्ट बॉरला यांनी टाइम्स ऑफ इस्त्रायलशी बातचीत करताना म्हटले की, कोरोना व्हायरस महामारीवरील उपचाराचे औषध यावर्षी ऑक्टोबरपर्यंत तयार होऊ शकते. त्यांनी म्हटले, आमच्याजवळ याचे योग्य पुरावे आहे की, यावर्षी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसचे औषध तयार होईल. फायजर ही जर्मनीची कंपनी बायोनटेक सोबत मिळून युरोप आणि अमेरिकेमध्ये औषध बनवण्यासाठी काम करत आहे.

कोरोना व्हायरसचे औषध बनवण्यासाठी काम करत आसलेल्या आणखी एका औषध कंपनीने सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे की, या वर्षीच्या अखेरपर्यंत कोविड-19 चे औषध बाजारात येईल. या कंपनीचे नाव एस्ट्रेजेनेका आहे. ती युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डसोबत मिळून वॅक्सीन बनवण्याचे काम करत आहे. एस्ट्रेजेनेकाच्या प्रमुखांचे म्हणणे आहे की, 2020 च्या अखेरपर्यंत औषध बाजारात येईल.

एस्ट्रेजेनेकाचे प्रमुख पास्कल सॉरिएट म्हणाले, अनेकांना वाटते की याच्यावर औषध असावे. या वर्षाच्या अखेरीस ते मिळेल. औषध शोधण्याच्या प्रयत्नात वेळही वेगाने निघून जात आहे. जगभरात सुमारे 100 पेक्षा जास्त लॅब कोरोना व्हायरसचे औषध तयार करण्यात गुंतल्या आहेत. यापैकी 10 लॅब आपल्या औषधाची क्लिनिकल ट्रायल करत आहेत. या महामारीमुळे जगभरात 3.58 लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 लाखांपेक्षा लोक संक्रमित झाले आहेत.