आता कोणत्याही Document शिवाय बनवू शकता Aadhaar Card, UIDAI नं सुरू केली नवी सुविधा

नवी दिल्ली : आधार कार्ड भारतात राहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. आता आधार कार्डचे महत्व पहिल्यापेक्षा आणखी वाढले आहे. अनेकदा आधारशिवाय कामे रखडली जातात. आधार कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र आणि अ‍ॅड्रेस फ्रूफ सारखी कागदपत्र जरूरी असतात. परंतु, आता कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय आधार काढता येईल. तुम्ही आधार केंद्रावर इंट्रोड्यूसरची मदत घेऊ शकता. डॉक्यूमेंटशिवाय आधार कसे तयार करायचे ते जाणून घेवूयात…

इंट्रोड्यसरची घेऊ शकता मदत
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने डॉक्यूमेंट्सशिवाय आधार बनवण्याची सुविधा दिली आहे. इंट्रोड्यूसर तो व्यक्ती असतो, ज्यास रजिस्ट्रारद्वारे अशा रहिवाशांना ओळखीसाठी अधिकृत केले जाते, ज्यांच्याकडे ओळखपत्र आणि अ‍ॅड्रेस प्रुफ नाही. इंट्रोड्यूसरजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि अर्जदारासोबत त्याने आधार नोंदणी सेंटरवर उपस्थितीत राहाणे आवश्यक आहे.

3 महीने असते वॅलिडिटी
इंट्रोड्यूसरने अर्जदाराची ओळख आणि अ‍ॅड्रेस कन्फर्म करणे जरूरी आहे. त्यांना एनरॉलमेंट फॉर्मवर यासाठी हस्ताक्षर करणे आवश्यक असते. युआयडीएआयकडून जारी सर्क्युलरनुसार, इंट्रोड्यूसरसाठी अर्जदाराच्या नावे सर्टिफिकेट जारी करावे लागते. त्याची वॅलिडिटी 3 महीने असते.

जर तुमच्याकडे ओळखपत्र आणि अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल तरी सुद्धा आधार कार्डसाठी अर्ज करता येतो, यासाठी रेशनकार्डसारख्या एखाद्या कौटुंबिक डॉक्युमेंटमध्ये नाव असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात जरूरी आहे की अगोदर कुटुंब प्रमुखाचे ओळखपत्र आणि अ‍ॅड्रेस प्रुफच्या आधारावर आधारकार्ड तयार केलेले असावे. यानंतर कुटुंबप्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा इंट्रोड्यूसर बनू शकतो.