‘या’ टेलिकॉम कंपनीतील 1500 लोकांच्या नोकरीवर टांगती तलवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी वोडाफोन-आयडियामध्ये सध्या कठीण प्रसंग सुरु आहे. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या नोकिया, एरिकसॉन, हुवेई आणि झेडटीई या सारख्या कंपन्यांनी वोडाफोन-आयडियाकडून 4G उपकरणांच्या ऑर्डर बंद केल्या आहेत. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांचे असे मत आहे की, आर्थिक संकटाशी लढणाऱ्या या दोन कंपन्यांकडून पैसे मिळण्यामध्ये समस्या येऊ शकते. त्यामुळे वोडाफोन-आयडियाचा एक्सपेंशन प्लॅन देखील प्रभावित होत आहे.

वोडाफोन-आयडियाच्या वापरात घट
सर्व्हिसच्या कमतरतेमुळे वोडाफोन-आयडियाचा युजर दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या या कंपनीमधून 1500 कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. आर्थिक संकटाचा सामान करणाऱ्या या कंपनीने त्यांचे 22 सर्कलमधील काम 10 सर्कलमध्ये सीमित केले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने इंग्रजी पेपरशी बोलताना सांगितले की, वोडाफोन-आयडिया त्यांचे व्यवहार रिस्ट्रक्चर करण्याच्या प्रयत्नात आहेत. टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या युरोपमधील एका वेंडरने नवीन ऑर्डरमधील सिक्युरिटी स्वरुपात काही रक्कम घेण्याचा निर्णय घेतला.

चीनी वेंडरची पेमेंट योजना काहीशी फ्लेक्सिबल होती, मात्र त्यांनी देखील नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. तसेच नोकिया आणि एरिकसॉनसारख्या कंपन्याही सिक्युरिटी पेमेंटची मागणी करत आहेत. कोणतीही बँक गँरंटी देण्यासाठी तयार नाही. या कंपनीसाठी हे अत्यंत जोखमीचं काम आहे. नुकतेच वोडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयाला अशी माहिती दिली होती, कोणतीही बँक गॅरंटी देण्यासाठी तयार नाही. कारण मार्च अखेरपर्यंत त्यांचे कर्ज 1 लाख 12 हजार 520 कोटी पर्यंत पोहोचले आहे. वोडाफोन आयडियाला सरकारला अजून अॅडजस्टेट ग्रॉस रेव्हेन्यूच्या स्वरुपात 50 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम चुकती करायची आहे.