‘बाहुबली’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशवासीयांसह बॉलीवूडसाठी आजचा दिवस चांगला नव्हता. काल माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर देशभरात शोकांची लाट उसळली आहे आणि आज बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि हृतिक रोशन यांचे नाना जे ओ ओम प्रकाश यांचे निधन झाले. यानंतर आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. बाहुबली चित्रपटात काम करणार्‍या टीव्ही अभिनेता मधु प्रकाश यांची पत्नी भारती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
actor
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून, आता त्याचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मधु प्रकाश आणि भारती यांचे २०१५ साली लग्न झाले होते. भारती गृहिणी होती. ती हैदराबादच्या पंचवटी कॉलनीत तिच्या सासू-सास यांसह राहत होती. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनूसार, मधुच्या कामामुळे भारती नाराज होती. मधु कामाच्या निमित्ताने घरी रात्री उशिरा परत येत असे त्यामुळे यांच्यामध्ये खूप भांडत होत असत.

मंगळवारी सकाळी मधु प्रकाश जिमला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि त्यानंतर ते थेट सीरियलच्या शूटिंगसाठी गेला. भारतीने मधुला फोन करुन घरी येण्यास सांगितले. भारती यांनी मधुला धमकी दिली की तो घरी परत आला नाही तर ती आत्महत्या करेल. मधु घरी परत आला तेव्हा त्याला भारतीचा मृतदेह पंखेवर लटकलेला आढळला. घटनेनंतर मधुने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह खाली आणला आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like