खुशखबर ! नववर्षात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त   

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन वर्ष सामन्यासाठी दिलासा घेऊन येत असल्याचे आपणाला दिसते आहे. येत्या नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. देशात पेट्रोलचे दर येत्या काही दिवसात कमी होण्याचा संभव असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घट हि पेट्रोल डिझेल दरात घट होण्यास कारणीभूत ठरली आहेत. नव्या वर्षात पेट्रोल काही रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता असून मिथेनॉलयुक्त पेट्रोलला विकण्यास सरकारने मान्यता देताच पेट्रोल  १० ते १५ रुपयांनी स्वस्त होणार आहे अशा अंदाज अर्थ तज्ञांनी व्यक्त केला आहे. कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळ पास ७१ टक्क्यांवर कच्या तेलांचे दर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण सध्या सुरु असल्याने बुधवारी क्रूड ऑइल ५० डॉलर प्रति बॅरल दराने विकले गेले आहे. तेच क्रूड ऑइल ऑक्टोबर २०१८ मध्ये  ८५.६ डॉलर प्रति बॅरलदराने विकले जात होते. तेव्हा पासून आज पर्यंत कच्या तेलाच्या दरांत लक्षणीय घट झाली असून  जवळपास ७१ टक्क्यांची घसरण क्रूड ऑइलच्या दरात झालेली आहे.

आगामी काळात येणार  मिथेनॉलयुक्त पेट्रोल

नीती आयोगाच्या देखरेखी मध्ये मोदी सरकार देशभरात १५ टक्के मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. या दृष्टीने पुण्यात चाचण्याही सुरु झाल्या आहेत. भविष्यात हि मोदी  सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल कमीत कमी  १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशा पासून तयार केले जाते.  ऊसापासून तयार केलेले इथेनॉल सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये  मिसळले जाते. इथेनॉलसाठी प्रती लीटर ४२ रुपये खर्च येतो. तर मिथेनॉलसाठी फक्त २०  रुपये प्रती लीटर खर्च येतो. इथेनॉलपेक्षा  मिथेनॉल स्वस्त असल्याने या पर्यायाचा विचार केला जात आहे. त्याच प्रमाणे  मिथेनॉलमुळे प्रदूषण ही कमी होते.

नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यामध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी घेण्यात आली आहे. त्याच प्रमाणे येत्या काही दिवसात मिथेनॉलच्या पेट्रोल मध्ये वापरण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात येईल आणि मिथेनॉलचे उत्पन्न घेऊन देशातील पेट्रोलचे दर घटवण्यास सरकारला यश येईल.