PM Kisan : प्रत्येक वर्षी मिळतात 6,000 रुपये, योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये तुमचे नाव आहे की-नाही असे पहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी देशातील शेतकर्‍यांना थेट मदत उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची योजना आहे. कोरोना संकटाच्या या काळात ही योजना देशाच्या अन्नदात्यासाठी मोठी दिलासादायक ठरू शकते. सरकारने कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनने प्रभावित शेतकर्‍यांना एप्रिलमध्येच 2,000 रुपयांचा हप्ता जारी केला आहे. सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी तीन समान हप्त्यात सहा हजार रूपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पाठवते. जर तुम्ही सुद्धा पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि या स्कीमच्या लाभार्थींच्या यादीत तुमचे नाव पहायचे असेल तर यासाठी एक सोपी पद्धत असून ती जाणून घेवूयात.

अशी आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस 

1. सर्वात आधी PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाइट (https://pmkisan.gov.in” rel=”nofollow/) वर जा.

2. येथे Farmers Corner वर आपल्या माऊसचा कर्सर न्या.

3. आता ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर Beneficiary List दिसेल.

4. या Beneficiary List वर क्लिक करा.

5. आता आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.

6. आता Get Report वर क्लिक करा.

7. यासोबतच आपल्या समोर आपल्या भागातील लाभार्थ्यांची यादी येईल.

8. तुम्ही या यादीत तुमचे नाव पाहू शकता.

जर, तुमचे नाव या लिस्टमध्ये दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा पीएम-किसान योजनेच्या वेबसाइटवर तपासू शकता. यासाठी तुम्हाला Farmers Corner वर जावे लागले. येथे तुम्ही Status of Self Registered/CSC Farmer वर क्लिक करून आपल्या अर्जाची स्थिती जाणू शकता. यासाठी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.