Coronavirus : लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट करणं गरजेचे आहे का? अमेरिकेच्या CDC चं उत्तर, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र लसीकरणावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उठत आहेत. कारण कोरोना  हा आजार सर्वासाठी नवीन आहे. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस doses घेतले तर कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे का? अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनने (सीडीसी) यावर उत्तर दिले आहे. जर तुम्ही कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असतील तर तुम्हाला कोरोना टेस्ट करणे किंवा क्वारंटाईन होण्याची गरज नाही. जरी तुम्ही एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तरी देखील याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनावरील नवीन संशोधनातून ही गाईडलाईन दिली आहे.

ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस doses घेतले आहेत.
त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे.
संशोधनाच्या दाव्यानुसार जरी तुम्हाला कोरोना झाल तरी देखील तुमच्यापासून तो दुसऱ्यांना होण्याचा अन् लक्षणे दिसण्याचा धोका कमी असतो.
सीडीसीनुसार जर कोणत्याही व्यक्तीने दोन्ही व्हॅक्सिन घेतल्या असतील तर त्याला स्क्रिनिंगचीदेखील गरज नाही.
कोरोनाचा धोका पाहून आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहेत.
ॲमेझॉनने आजपासून यावर वेळ घालवू नका असे आदेश दिले आहेत.
ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग याच सूचनेवरून थांबिविली आहे.
तर दुसरीकडे परेदशातून अमेरिकेत येणाऱ्या अमेरिकी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केले आहे.
यावरून अमेरिकेत तज्ज्ञांचे दोन गट प़डले आहेत.
सीडीसीने काही टेस्टिंग गाईडलाईन्स थोड्या बदलाव्यात.
सध्याच्या संकटात सामान्य ताप आणि व्हायरसदेखील कोरोनाकडे इशारा करतात.
यामुळे टेस्टिंग क्षमतेवर दबाव वाढतो, असे म्हटले आहे.

 

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती