खुशखबर ! सरकारी नोकरीची उत्‍तम संधी ; बँक, रेल्वे आणि इतर विभागात मोठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण सध्या सरकारकडून पोलीस भरती, रेल्वे भरती, शिक्षकांसह विविध सरकारी क्षेत्रातील भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तुम्ही देखील यासाठी अर्ज करु शकतात.

बॅक ऑफ बडोदामध्ये भरती – 
बॅकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी ही सुवर्ण संधी आहे. बँक आणि बडोदाने मोबाईल बँकिंग प्रोफेशनल्सच्या पदासाठी नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. बीटेक पदवीधारक या पदासाठी अर्ज करु शकतात. यासाठी ५ पदावर भरती प्रक्रिेया होणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे वय २३ ते ४५ वर्ष असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे.

पश्चिम बंगाल पॉल्युशन कंट्रोल बोर्डा भरती –
पश्चिम बंगाल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने ६ जूनियर लॅबोरेट्री असिस्टेंट पदासाठी भरती करुन घेण्यासाठी अर्ज मागवण्यात आला आहे. अर्ज करण्याचे वय २० ते ३९ वर्ष ठेवण्यात आला आहे. यासाठी २ जुलैला मुलाखत होणार आहे. इच्छूक उमेदवाराकडे बीएससीची डिग्री असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित लॅबोरेटरीमध्ये कमीत कमी एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

रेल्वेमध्ये भरती – 
सेंट्रल रेल्वेने विभिन्न विभागात भरती प्रक्रिया काढली आहे. यात एकूण २१६७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.  यासाठी अभियंता, क्लर्क आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ६५ वर्ष असावे. एवढेच नाही तर यापदांसाठी रिटायर झालेले रेल्वे कर्मचारी देखील अर्ज करु शकतात. या पदांसाठी १० वी पासून पदवीधर असे सर्व अर्ज करु शकतात. अर्ज करण्याचे अंतिम मुदत १२ जुलै २०१९ आहे.

उत्तर प्रदेश पोलीस भरती –
उत्तर प्रदेश पोलीस परिवहन शाखेत मुख्य मोटार परिवहन मध्ये २७२ पदासाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी विविध परिक्षा घेण्यात येतील आणि त्यातून उमेदवारीची निवड केली जाईल.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी