खुशखबर…! SBI मध्ये होणार मोठी भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर. स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लार्क पदासाठी ८,६५३ जागा भरण्याची घोषणा केली आहे.

सध्या देशात बँकिंग क्षेत्रात करियर करू इच्छिणारे अनेक उमेदवार आहेत मात्र बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी जास्त संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार नाराज होत असतात. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लार्क पदासाठी तब्बल ८,६५३ जागा भरण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी आज १२ एप्रिल पासून ते ३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

११ एप्रिलला ही अधिसूचना घोषित झाली आहे. १२ एप्रिल ते ३ मी पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. जून महिन्यामध्ये प्राथमिक परीक्षेसाठी काॅल लेटर येणार आहे. त्यानंतर जून महिन्यातच प्राथमिक परीक्षा होणार आहे. तसेच जुलै महिन्यात मुख्य परीक्षेसाठी काॅल लेटर असणार आहे. आणि १० ऑगस्टला मुख्य परीक्षा होणार आहे.

ज्यामध्ये, ३६७४ जागा या जनरल साठी असणार आहे. तसेच ८५३ EWS , १९६६ OBC साठी. तसेच ७९९ ST साठी. तर १३६१ SC साठी या पदांची भरती होणार आहे. २० ते २८ वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदाच्या ८९०४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे.

परीक्षा – जून २०१९ मध्ये पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मे २०१९ आहे.

अर्ज कारण्यासाठी प्रक्रिया

https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers SBI च्या या वेबसाइटवर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us