World Cup 2019 ; सलामीवीर शिखर धवन अद्याप भारतीय संघात ; BCCI चे स्पष्टीकरण

लंडन : वृत्तसंस्था –  वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. वर्ल्डकप खेळू शकणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या. पण आता शिखर धवनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शिखर धवन अद्याप वर्ल्डकपमधून बाहेर झालेला नाही.

मंगळवारी उशिरा शिखर धवनच्या दुखापतीवरील अंतिम अहवाल समोर आला आहे. यामध्ये धवनच्या अंगठ्याला हेयरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. या अहवालानंतर बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे की पुढील एक आठवड्यापर्यंत शिखर धवन भारतीय संघासोबत असून BCCI ची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीची देखरेख करणार आहे.

या आधी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंत किंवा अंबाती रायडूला संधी दिली जाईल, अशी चर्चा चालू होती. धवनच्या जखमेत सुधारणा न झाल्यास ऋषभ पंतला धवनच्या जागी संधी देण्यात येईल.

भारतीय संघ व्यवस्थापन धवनला देऊ इच्छित आहेत वेळ

जर धवनच्या जखमेत सुधारणा न झाल्यास ऋषभ पंतला धवनच्या जागी संधी मिळू शकते. ऋषभ पंतला सज्ज राहण्याचे आदेश संघ व्यवस्थापनाने दिले आहेत. सध्यातरी, शिखर धवनला संघासोबत ठेऊन जखमेत सुधारणा होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. जखमेत सुधारणा झाल्यास तो भारतीय संघासोबत खेळू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला झाली होती दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज पॅट कमिंसच्या चेंडूमुळे धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. या सामन्यात शिखर धवनने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. धवनला तीन आठवड्याची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा