भाजपच्या ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’ला मोठा प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’ला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. आज संपूर्ण शहरात ५५० हून अधिक ठिकाणी तीन हजार कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर २५ हजार पदवीधरांची मतदार नोंदणी केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक‘म पाटील यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन नोंदणीला प्रोत्साहन दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, पश्‍चिम महाराष्ट्र नोंदणी प्रमुख राजेश पांडे, पुणे नोंदणी प्रमुख डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी नोंदणीसाठी मार्गदर्शन केले.

निवडणुक आयोगाची पुढील सुचना येईपर्यंत मतदार नोंदणीची प्रकि‘या सुरू राहणार असून, आगामी काळात बूथ आणि संस्था स्तरावर अधिकाधिक नोंदणी करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.