पुण्यातील वसंत फडकेंवर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन नुकतेच मुंबईत झाले. या अधिवेशनात संघटनात्मक मुख्य जबाबदाऱ्या अ‍ॅड.सुधीर पाटसकर आणि वसंत फडके यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोपवल्या. ठाकरे यांनी, त्या दोघांना व्यासपीठावर बोलावून त्यांची ओळख कार्यकर्त्यांना करून दिली. हा आपला मोठा सन्मानच आहे अशी भावना या दोन्ही संघटकांनी व्यक्त केली.

अ‍ॅड.सुधीर पाटसकर हे पुणे जिल्ह्यातील बारामतीतले आणि वसंत फडके हे पुणे शहरातील. २०११साली वसंत फडके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. २०१२साली चारा छावणी देखरेखीचे विशेष काम राज ठाकरे यांनी त्यांच्यावर सोपविले. त्यानंतर १४४विधानसभा मतदारसंघातील गटाध्यक्षांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद या शहरातील संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या होत्या. आता राज्याच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भाजपचे खासदार कै.अण्णा जोशी यांचे स्वीय सचिव आणि महाराष्ट्र विधीमंडळ भाजप सचिव म्हणून फडके यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले आहे. स्व.गोपीनाथ मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांच्या समवेत त्यांनी विधीमंडळाचे काम केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोपविलेल्या नव्या जबाबदारी बद्दल बोलताना फडके म्हणाले, राजसाहेबांनी माझा मोठा सन्मानच केला आहे. संघटनेसाठी अव्याहत काम करण्याला माझे प्राधान्य राहील. येत्या दोन दिवसात राजसाहेबांशी चर्चा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेन.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like