Autopsy Report मध्ये सुशांतच्या गळ्यावर ’लिगेचर’ मार्क आढळला, जाणून घ्या या निशाणीचा अर्थ

नवी दिल्ली : बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. याच दरम्यान सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टची एक बाब समोर आली आहे, ज्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर लिगेचर मार्क असल्याचा उल्लेख आहे, आता हा लिगेचर मार्क म्हणजे काय? आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण काय सांगितले आहे ते जाणून घेवूयात.

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचे कारण फाशीमुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, परंतु या रिपोर्टमध्ये सुशांत सिहं राजपूतच्या गळ्यावर लिगेचर मार्क असल्याचा सुद्धा उल्लेख आहे. लिगेचर मार्क ज्यास सामान्य भाषेत गडद व्रण म्हटले जाते, ज्यावरून समजते की, एखाद्या रश्शीसारख्या वस्तूने आवळण्यात आले आहे.

गळ्यावरील निशाणीची माहिती

* सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीवर जे व्रण होते, ते 33 सेंटीमीटर लांब होते.
* रश्शीचा व्रण हनुवटीपासून 8 सेंटीमीटर खाली होता.
* गळ्याच्या उजव्याबाजूला व्रणाची रूंदी 1 सेंटीमीटर होती.
* गळ्याच्या डाव्याबाजूला व्रणाची रूंदी 3.5 सेंटीमीटर होती.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या निशाणीशिवाय सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतच्या गळ्यावर आणि डोक्याच्या जवळपास कोणतेही हाड मोडलेले नव्हते. सुशांतच्या पीएम रिपोर्टवरून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण यामध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही. याशिवाय सुशांतच्या मृतदेहाची कोरोना टेस्टसुद्धा करण्यात आली नव्हती.

आता जेव्हा सीबीआयच्या हातात सुशांतचा ऑटोप्सी रिपोर्ट आला असून तपास पथक त्या पाच डॉक्टरांची चौकशी करणार आहे, ज्यांनी सुशांतचे पोस्टमार्टम केले होते. रिया चक्रवर्ती सुद्धा 15 तारखेला कुपर हॉस्पीटलमध्ये शवागृहात पोहचली होती, ते देखील तिला कायदेशीर परवानगी नसताना. यामुळे डॉक्टरांना हेदेखील विचारले जाऊ शकते की, ऑटोप्सी रिपोर्ट येण्यापूर्वी रिया 45 मिनिटे तेथे काय करत होती.

रिया चक्रवर्ती, सुशांतची नातेवाईक नाही, यामुळे हॉस्पीटल प्रशासन आणि पोलीस दोघांवर संशय व्यक्त केला जात आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, रियाला सुशांतचा चेहरा अखेरचा पहायचा होता.