आईचा खून करून आत्महत्या करणार्‍या ‘प्रोफेसर’बद्दल धक्कादायक माहिती उजेडात, वाचा काय विचार करत होता ‘एलन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आईची हत्या करून आत्महत्या केलेल्या प्रोफेसर एलन स्टेनल याच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. यामुळे पोलिसदेखील हैराण झाले असून प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आली नसून मल्याळम भाषेत लिहिलेले एक पत्र आढळून आले आहे. हत्या झालेली प्रोफेसरची आई आणि त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

त्यामुळे कायदेशीर लढाईच्या कचाट्यात सापडल्यामुळे दोघेही मानसिक तणावाखाली होते. एलन याने आईची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तपासात पोलिसांना काही धक्कादायक माहिती हाती लागली असून 2017 मध्ये एलनचे वडील स्टेनली यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या आईने दुसरा विवाह केला. मात्र सात महिने अगोदर त्याच्या सावत्र वडिलांनी देखील आत्महत्या केली.

सुरुवातीला दुसऱ्या पित्याची मुले हे प्रकरण झाकत होती. मात्र मृत्यूनंतर आपल्या वडिलांनी सर्व संपत्ती हि दुसऱ्या पत्नीच्या नावे केल्याचे समजल्यानंतर त्यांनी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे तणावाखाली येत त्याने आईची हत्या करत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, हि हत्या आहे कि आत्महत्या आहे याचा अजून तपास लागला नसून वैद्यकीय तपासणीत हे उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोघांवरही दाखल असलेल्या गुन्ह्यात ते सध्या जामीनावर बाहेर होते.

 

Visit : Policenama.com

You might also like