महाभयानक ! आई आणि २ मुलींचे ‘तुकडे-तुकडे’ केले अन् कुत्र्याला खायला दिले

भिवानी (हरियाणा) : वृत्तसंस्था – आई आणि दोन मुलींची हत्या करून त्यांचे तुकडे-तुकडे करुन ते कुत्र्याला खायला दिल्याची महाभयानक घटना हरियाणातील भिवानी येथे घडली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी राजेश कबाडी याला पोलीसांना ताब्यात घेतले आहे.

आरोपीने आई व २ चिमुकची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन गॅसवर जाळून टाकले. ८ महिन्यांच्या चिमुकलीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते कुत्र्याला खायला दिले. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी राजेश कबाडीला २८ जून रोजी ताब्यात घेऊन २९ जून रोजी कोर्टात हजर केले. आरोपीने दिलेल्या माहितीनूसार मृतदेहाचे शिर शोधण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलीसांकडून घटना घडलेल्या परिसरात १५० कर्मचाऱ्यांची टीम तयार करुन काॅम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेहाचे शिर शोधण्यास पोलीसांना यश आले.

राजेश हा या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार असून त्याच्यासोबत दुसरेही दोन साथीदार होते. मक्खन आणि पूनम अशी त्या दोघांची नावे आहेत. पोलीसांनी त्यांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

You might also like