गुप्तचर यंत्रणांनी केला मोठा खुलासा ! काश्मीरमधील दहशतवादी हिंसेत पाकच नव्हे, ‘हा’ देशसुद्धा सहभागी !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एकीकडे गलवान आणि दुसरीकडे काश्मीर. चीन आणि पाकिस्तानची नापाक आघाडी या दोन्ही भागात गोंधळ उडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतावर दोन्ही बाजूने हल्ल्याचा प्लॅन त्यावेळी तयार झाला जेव्हा चीनचे उप पंतप्रधान हान झेंग यांनी इस्लामाबादचा दौरा केला होता.

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानपेक्षा चीन जास्त चिंतेत आहे. कारण चीनला शंका आहे की, भारत कधीतरी पीओके गिलगिट बाल्टीस्तान परत घेईलच, पण अक्साई चिन परत घेण्यासाठी कारवाई करू शकतो. यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्लान बनला होता की, भारतला काश्मीर आणि लडाख सीमेवर असे गोंधळून सोडायचे की त्याने दोन्ही भाग परत घेण्याचा विचार सोडून द्यावा.

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानला काश्मीरमध्ये फिदायनी हल्ल्यांचे प्रमाण वाढवण्यास सांगितले होते. म्हणूनच काश्मीरमध्ये एनएच 44 वर हल्ला करण्याचा कट रचला गेला. हे षडयंत्र साकारण्यासाठी पाकिस्तानकडूनही गोळीबार सुरू आहे, जेणेकरून परदेशी दहशतवाद्यांचे गट भारतात घुसून विनाश करू शकतील. गलवानमधील चीनच्या प्लॅन फसला आहे. पण पाकिस्तान काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट रचत आहे. दहशतवाद्यांसह आयएसआय एजंटही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. या सर्वांकडे चियना मेड कॉम्बॅट वेपन असल्याचीही माहिती मिळाली आहे.

भारतीय एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीओकेच्या कोटली भागात लष्कर-ए-तैयबाचे सहा दहशतवादी आणि तीन आयएसआय एजंट आहेत. सीमेच्या पलीकडे असलेल्या खेड्यांमध्ये आश्रय घेतल्यानंतर आता हे लोक दोन गटात विभागले गेले आहेत. एक गट साबरा गली व दुसरा गट शाहपुरा भागातून भारतात घुसू शकतो. पुलवामामध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी आधीपासूनच असल्याची माहितीही मिळाली आहे. स्थानिक तरुणांना हाताशी घेऊन पाकिस्तानी दहशतवादीही आत्मघातकी हल्ले करण्याचा कट रचत आहेत. त्यांच्याकडे चियनामेड कॉम्बॅट शस्त्रे आहेत

पाकिस्तानच्या नापाक प्रयत्नांचा एक म्हणून त्याने भारतातील त्याच्या सर्व दहशतवाद्यांना मोठे आणि आत्मघाती हल्ले करण्यास सांगितले आहे. पुलवामात असलेल्या दहशतवाद्यांचा एक गट आणि ज्यामध्ये परदेशी दहशतवादी असल्याचे सांगितले जाते आहे, त्यानुसार आदिल अहमद यास आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही सर्व माहिती सुरक्षा दलाला दिली आहे. या माहितीच्या आधारे काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्यांना मृत किंवा जिवंत पकडण्याचा प्रयत्न सुरक्षा दल करीत आहेत.