मोठा खुलासा ! ‘कोरोना’ किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच होती कल्पना

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या वर्षी कोरोनाने जगभरात थैमान घातलं होतं. या कोरोनामुळे अनेकदा चीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. परंतु चीननं हे आरोप नाकारण्याचे प्रयत्न केले होते. कोरोनामुळे आतापर्यंत कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवाला लागला आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बलाढ्य देशांमध्येही कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला होता. तसेच आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडला होता. मात्र चीनच्या काही डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर काही सत्य मांडली आहेत. यामुळे पुन्हा एकदा चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

कोरोना विषाणू हा किती घातक आहे याची आधीपासूनच कल्पना होती असं काही चीनच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं असा दावा ब्रिटनची न्यूज वेबसाईच मिररनं केला. कोरोना किती घातक आहे, त्याचा किती वेगानं प्रसार होऊ शकतो याची कल्पना आरोग्य कर्मचाऱ्यांना होती. परंतु त्यांना खोटं बोलण्यास सांगण्यात आलं होतं. डिसेंबर २०१९ मध्येच हा विषाणू किती भयानक असू शकतो याची कल्पना आली होती. या कोरोना विषाणूमुळे लोकांचे प्राणही जात असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला जानेवारीत देण्यात आली. कोरोना विषाणू किती वेगाने एकातून दुसऱ्या व्यक्तीत प्रवेश करतो हे देखील हॉस्पिटलांना सांगण्यास मनाई केली होती, असे डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चीनमधील बिघडतं वातावरण पाहता नव्या वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. ITV वर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘आउटब्रेक: द व्हायरस दॅट शूक द वर्ल्ड’ या डॉक्युमेंट्रीमध्ये वुहानमधील डॉक्टरांनी सत्य मांडलं आहे. त्यांच्या सुरक्षेकडे पाहता त्यांचे चेहरे लपवण्यात आले आहेत. छुप्या कॅमेऱ्यांसमोर डॉक्टरांनी केलेल्या अनेक दाव्यांमुळे पुन्हा एकदा चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

डिसेंबरच्या अखेरिस अथवा जानेवारीच्या सुरूवातीला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. माझ्या ओळखीच्या व्यक्तीसहित त्याच्या कुटुंबातील सर्वांनाचा कोरोनाची लागण झाली होती,” अशी माहिती एका डॉक्टरनं बोलताना दिली. या दरम्यान,चीनने १२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेला या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला होता.