भाजपला मोठा धक्का ! नगरसेवक फुटल्यानं ‘या’ महापालिकेत शिवसेनेचा विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या आघाडीचा परिणाम पालिकेतही पाहायला मिळाले आहेत. शिवसेनेने अवघ्या अडीच वर्षात भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे.

महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांना भाजपच्या काही नगसेवकांनी मतदान केल्याने आणि राष्ट्रवादीनेही तसेच टीम ओमी कलानी पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 43 मतं मिळाली तर भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार जीवन ईदनानी यांना 35 मतं मिळाली.

उल्हासनगर महापालिकेत 2017 मधील निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला सोबत न घेताच पहिल्यांदा टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कलानी कुटुंबाच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली होती. भाजपने व्हीप बजावलेला असतानाही नगसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली. पालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांना महापौर पद देण्याची तयारी दर्शवली होती.

Visit : Policenama.com