IPL : कर्णधार रोहित शर्माला मोठा ‘धक्का’, मुंबई इंडियनच्या ‘या’ खेळाडूवर ‘बंदी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलचा नवा हंगाम सुरु होणार आहे, त्यासाठीचे ऑक्शन देखील झाली आहे. परंतु मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. कारण स्पर्धेपूर्वीच या संघाच्या खेळाडूंवर वाईट वेळ आली असून त्यांच्यावर बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात गोलंदाजांना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसते. परंतु आगामी हंगामात संघात घेण्यात आलेल्या एका गोलंदाजांची शैली अवैध असल्याचे समजले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.

 

गोलंदाजांची शैली अवैध असल्याचे समजले असून त्याबाबतचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. हा अहवाल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या घडीली निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही परंतु त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. या अहवालाचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू असलेला दिग्विजय देशमुखने सय्यद मुश्ताक अली टी – 20 स्पर्धेच्या 7 सामन्यांमध्ये 9 बळी घेतले. या 21 वर्षीय खेळाडूने जम्मू काश्मीर संघाविरुद्ध रणजी करंडक क्रिकेटमधून पदार्पण केले होते. या सामन्यात आठव्या क्रमांकावर खेळताना त्याचे 81 धावांची खेळी केली.

सचिन रियाझ बागवान हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांनी याबाबत सांगितले की, गेल्या सामन्यात दिग्विजयची गोलंदाजीची शैली अवैध असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. यासंबंधित अहवाल आम्हाला मिळाला. आम्ही हा अहवाल संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना पाठवला आहे. दिग्विजयला सध्या निलंबित करण्यात आले नाही परंतु संघातून बाहेर काढण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/