पुण्यातील शनिवार वाड्याजवळ मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा ‘पर्दाफाश’ ; ‘देशपांडे’ दाम्पत्य गजाआड, ६७ लाखाचे स्टॅम्प जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट बिल्डींगमधून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे 100 आणि 500 रूपयांचे स्टॅम्प पेपर जप्‍त केले असुन याप्रकरणी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून हा घोटाळा करण्यात येत होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीसवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे दाम्पत्य हे कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढून नंतर त्यावर बनावट शिक्क्याचा वापर करून ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारामार्फत समजली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ सुनिल कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट बिल्डींगमधील देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील शॉप नंबर 1 आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला. तेथून 100 आणि 500 रूपये किंमतीची 67 लाख 30 हजार रूपयांची स्टॅम्प पेपर जप्‍त करण्यात आली आहेत. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने आपआपसात संगनमत करून कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार असा शिक्‍का तयार केला. कोषागार कार्यालयातून स्टॅम्प पेपर बाहेर काढताना हा शिक्‍का मारला जातो. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून टॅम्प पेपरची विक्री केली. आरोपींनी एवढया मोठ्या रक्‍कमेचे स्टॅम्प पेपर कोठुन आणले याबाबत तपास चालु आहे.

स्टॅम्प पेपरची कृत्रिम टंचाई
शहरातील अनेक स्टॅम्प व्हेंडरकडे अलिकडील काळात स्टॅम्प पेपर उपलब्ध नसतो. कारण, देशपांडे यांच्यासारख्या अनेकांनी हा उद्योग सुरू केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अशा प्रकारचे स्टॅम्प कोठे-कोठे विकले जातात याची माहिती घेण्याचे काम चालु आहे. दरम्यान, देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाकडे 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे 100 व 500 रूपयांचे स्टॅम्प कोठुन आले हे याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

‘तेलगी’ घोटाळ्याची परत आठवण
विश्रामबाग पोलिसांनी देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील आणि बुधवार पेठेतील व्हेंडरच्या दुकानात छापा टाकला आणि टॅम्प पेपर जप्‍त करण्यास सुरवात केली. 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे स्टॅम्प असल्याने शनिवार, सदाशिव आणि नारायण पेठेत तेलगी घोटाळयासारखा घोटाळा पुन्हा एकदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे अशीच चर्चा चालु होती. तेलगी घोटाळा देखील पुण्यातच उघड झाला होता. तेलगी घोटाळयाचे धोगेदारे संपूर्ण देशात पसरले होते. आता तेलगी घोटाळयानंतर देशपांडे घोटाळा किती मोठे स्वरूप धारण करते हे पहाणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय