काँग्रेस नेते म्हणतात, RSS चे लोक लग्न करत नाहीत म्हणून ‘हनीट्रॅप’ होतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमध्ये घडलेल्या ‘हनीट्रॅप’ कारणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राजकीय नेते मात्र स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एका काँग्रेस नेत्याने केलेल्या विधानामुळे एका नव्या वादाला सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. मानक अग्रवाल यांनी हनीट्रॅप सारख्या घटना घडण्याचे कारण आरएसएसचे अविवाहित लोक असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे अग्रवाल हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत.

काँग्रेस प्रदेशच्या वरिष्ठ नेते पदी असलेले मानक अग्रवाल म्हणतात, शिवराज सिंह चौहान हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हनीट्रॅप कांडला सुरुवात झाली. हा प्रकार बाहेरील पाच सहा राज्यांमध्ये सुद्धा सुरु आहे जिथे भाजप चे सरकार आहे. तसेच हनीट्रॅप होण्याचे कारण हे आहे की आरएसएसचे लोक लग्न करत नाहीत असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणले की आरएसएसच्या लोकांनी विवाह करायला हवा जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.

बीजेपीने केला पलटवार
काँग्रेस नेत्याच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना गोपाल भार्गव म्हणाले की, अग्रवाल हे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहेत. ते म्हणाले की काँग्रेस सहित बाकी पक्षांमध्ये देखील अविवाहित लोक आहेत अग्रवाल हे अशा सगळ्या लोकांवर आरोप करत आहेत. आरएसएस चे नेते देशभक्त आहेत आणि देशासाठी काम करतात आणि आरएसएस चे सर्वच लोक अविवाहित नसतात. मात्र ज्यांना पूर्ण वेळ देशभक्ती करायची असते असे लोक अविवाहित राहतात. अग्रवाल यांनी केलेले वक्तव्य अगदीच खालच्या पातळीचे आहे असे भार्गव म्हणाले.

Visit : Policenama.com