शिवसेनेमध्ये लवकरच मोठा ‘भूकंप’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या खंद्दे ‘समर्थक’ आमदारचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेमध्ये लवकरच मोठा भूकंप होईल, लवकरच उलटपुलट होईल असा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांनी हा गौप्यस्फोट कोणत्या आधारावर हे मात्र अद्यापही गुलदस्त्याच आहे.

आमदार रवी राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खंद्दे समर्थक आहेत. एवढेच नव्हे तर राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी देखील भाजपाचेच सरकार येईल असं सांगत होत्या. यापेक्षाही अनेक वेगळी विधानं करून रवी राणा यांनी यापुर्वीच खळबळ उडवून दिली आहे.

मात्र, आज (रविवार) आमदार रवी राणा यांनी कोणत्या आधारावर शिवसेनेत लवकरच मोठा भूकंप होईल असं थेट प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं हे आगामी काळातच खरं की खोटं हे ठरणार आहे. रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंद्दे समर्थक आहेत.

Visit : Policenama.com