…म्हणून मी शिवसेना सोडली : डॉ. अमोल कोल्हे यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरूध्द निवडणूक लढणार का अशी विचारणा शिवसेनेकडून झाली आणि त्याच वेळी मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी माझ्याकडून होणार नाही असे उत्‍तर दिले. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडल्याचा मोठा गौप्यस्फोट शिरूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. डॉ. कोल्हेंच्या या गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात दि. 29 रोजी मतदान होणार आहे. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची आज (शनिवार) सांगता झाली. सांगता सभेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सांगता सभेत डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा गोप्यस्फोट केल्यानंतर खळबळ उडाली. शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर आत्‍तापर्यंत त्यांनी शिवसेना का सोडली याबाबत मौन धारण केले होते. मात्र, आज त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सोशल मिडीयावरून काही फोटो व्हायरल केले जात आहेत. त्याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा अशी विचारणा होते. पण सातार्‍यातुन निवडणूक लढवणार का हे शिवसेेनेकडून विचारण्यात आले होते. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.