‘जय काली कलकत्‍ता वाली ५६ इंच की हवा निकाली’ : जितेंद्र आव्हाड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या आठवडयाभरापासुन पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष पहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्‍तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता घणाघात केला असून त्यांनी ममता बनर्जी यांनी केलेल्या टीकेचे समर्थन केले आहे.

‘जय काली कलकत्‍ता वाली 56 इंच की हवा निकाली’ असे म्हणत आव्हाड यांनी ममता बॅनर्जी यांचा एक फोटो व्टिटर अकाऊंट वर पोस्ट केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्याखाली अंध मुक्‍त भारत असे लिहीले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी आता केवळ शेवटच्या म्हणजेच 7 व्या टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी एक रोड शो केला होता. त्यामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. निवडणूक आयोग भाजपच्या सभांची सोय करून नियम काढत असल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्‍चिम बंगाल मध्ये चालु असलेले वातवारण अतिशय घातक असल्याचे अनेक राजकीय पक्षांनी म्हटले आहे. त्यामध्येच आता जितेंद्र आव्हाड यांनी ‘जय काली कलकत्‍ता वाली 56 इंच की हवा निकाली’ असे पोस्ट करून मोदींवर टिका केली आहे. दि. 23 मे रोजी लोकसभा निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांमधील वाद संपुर्ण देशाला पहावयास मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like