सुनील गावस्कर यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘भविष्यात रिषभ पंत भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतचे भरभरून कौतुक केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 23 वर्षीय कर्णधार रिषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार बनेल, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. श्रेयस अय्यर याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभकडे आले. रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएल 2021 मध्ये 8 पेकी 6 सामन्यात विजय मिळवले आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चितीसाठी दिल्लीला उर्वरित सामन्यांत केवळ 2 विजयांची गरज होती.

रिषभने नेतृत्व कौशल्यासोबत फलंदाजीतही आपली धमक दाखवली आहे. गावस्कर म्हणाले, युवा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी करून दाखवली. सहाव्या सामन्यानंतर त्याला कर्णधारपदाबाबत विचारल्यावर तो कंटाळला होता. संधी मिळाल्यास धमाकेदार कामगिरी करून दाखवण्याची प्रचिती त्याने दाखवली. त्याच्याकडूनही चूका झाल्या, कोणत्या कर्णधाराकडून होत नाहीत?.पण आयपीएलच्या काही सामन्यानंतर त्याने नव्या गोष्टी शिकण्यात हुशारी दाखवली. अनेक निर्णयाने ते सिध्दही केल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे. पंतने आयपीएल 2021 मध्ये 8 सामन्यात 35+ च्या सरासरीने 213 धावा केल्या आहेत.