तळेगावमध्ये मोठी चोरी चौदा किलो चांदी, ९० तोळे सोने, डायमंड रिंगा, रोकड चोरीला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नामांकित कंपनीतून सेवा निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बंगल्याची खिडकी काढून तब्बल २३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरुन नेला. यामध्ये १४ किलो चांदी, ९० तोळे सोने, साडे तीन लाखाच्या डायमंड रिंगा आणि दीड लाख रुपयांची रोखड चोरीला गेली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ec3071a-ae07-11e8-8db7-9b74159d2712′]

या प्रकरणी अशोक रघुनाथ कोरे (६३, रा. मधूबन स्मार्ट सिटी, चाकण रोड, तळेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरे हे एका नामांकित कंपनीतुन सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांचे मुंबई आणि तळेगाव येथे आलिशान घर आहे. १४ ऑगस्ट रोजी ते परिवारासह कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांनी तळेगावच्या बंगल्यात घरातील कपाटातील १४ किलो चांदी, ९० तोळे सोने, डायमंड हार आणि दीड लाख रुपयांची रोखड ठेवली होती.

शनिवारी सायंकाळी कोरे हे तळेगाव येथे आले. दरवाजा उघडून आत गेले असता बेडरूममधील कपाटातील ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यासह सर्व अधिकारी, गुन्हे शाखा व इतर शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. माहिती घेऊन तपासाच्या दृष्टीने माहिती दिली.
तळेगाव पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस पथके आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी