home page top 1

‘पूल बेबी’ जसलीन मथारूचे पूलकिनारी मस्ती करतानाचे ‘बिकीनी’ फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 12 मध्ये आपल्या लुकने प्रेक्षकांना वेड लावणारी जसलीन मथारू सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. जसलीनने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

गोव्यातील मान्सून ऋतूचा जसलीन चांगलाच आनंद घेत आहे. एका फोटोत दिसत आहे की, जसलीन बिकीनी घालून स्विमिंग पूलच्या किनारी झोपली आहे. यात तिचा वेगळाच स्वॅग पहायला मिळत आहे.

ब्लॅक बिकीनीतील हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. हाय बन, सनग्लासेस मध्ये बिकीनी बॉडी फ्लॉन्ट करणारी जसलीन वेगळ्याच टशनमध्ये दिसत आहे.

जसलीनचा हा बोल्ड अंदाज याआधीही बिग बॉसच्या घरात चाहत्यांनी पाहिला आहे. ती बऱ्याचदा पूलमध्ये बिकीनी घालून उतरायची. जसलीनला पूल बेबी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बिग बॉस 12 मुळे जसलीनला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. व्यवसायाने सिंगर असणारी जसलीन सध्या अनेक इव्हेंट्समध्ये भाग घेताना दिसत आहे. जसलीन भजन सम्राट अनुप जलोटा यांच्याकडून संगीत शिकली आहे.

बिग बॉस 12 मध्ये जसलीन मथारू आणि अनुप जलोटा यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली. दोघेही गुरु शिष्याची जोडी बनून शोमध्ये आले होते. परंतु अशातच त्यांच्या अफेअरबद्दल खुलासा झाला. या वृत्ताने सर्वजण चकित झाले होते. नंतर हेही समोर आले होते की, अफेअरची चर्चा हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता. शोच्या बाहेर पडल्यानंतर जसलीनने त्यांच्यात काही नसल्याचे सांगितले होते.

View this post on Instagram

Haanji.. Hello 😎💄👗🎙👌

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

Loading...
You might also like