Bigg Boss 13 : गोविंदाची भाची आरती सिंहचा खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मधील स्पर्धक कधी भांडताना दिसतात तर कधी चिल मारताना दिसतात. कधी हे सदस्य एकमेकांशी काही गोष्टी शेअर करताना दिसतात. अशात अनेकांच्या नवीन गोष्टी समोर येत आहेत. गोविंदाची भाची आरती सिंहनेही तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला आहे. तिने कोणत्या परिस्थितीचा सामना केला हे सांगितले आहे.

आरती म्हणाली की, “माझ्या आयुष्यातील एक काळ खूच आव्हानात्मक आणि संघर्षाचा होता. मला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. काम मिळत नसल्याच्या तणावामुळे असे झाले होते. याचाच परिणाम करिअरवर होत होता. यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडलं होतं. माझे उपचार आणि माझी इच्छाशक्ती यामुळे मी यातून बाहेर पडले.”

पुढे बोलताना आरती म्हणाली, “कृष्णानेही मला त्या काळी खूप मदत केली. लग्नासाठी तेव्हा मला स्थळं येत होती. एक मला आवडलंही होतं. परंतु डिप्रेशनविषयी कळताच त्यांनी नकार कळवला. आईने मला खूप हिंमत दिली. आज मी आजारावर मात केली आहे आणि पूर्णपणे फिट आहे.”

https://www.instagram.com/tv/B3CVw3pnV3O/?utm_source=ig_embed

आरतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने अनेक मालिकेत काम केलं आहे. मायका, उडान, देवों के देव महादेव, ससुराल सिमर का ग्रहस्थी, वारिस अशा तिच्या मालिका सांगता येतील.

 

Visit : Policenama.com