‘BIGG BOSS 12’ फ्लॉप झाल्यानंतर मेकर्सने टाकले ‘हे’ मोठे पाऊल ; 13व्या सीजनमध्ये नाही दिसणार..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या पुढील सीजनसाठी तयारी अगदी जोरात सुरु आहे. मेकर्स बिग बॉस १३ ला हिट करण्यासाठी काहीच कसर सोडत नाहीये. १२ व्या सीजन नंतर मेकर्सपुढील आव्हान अधिकच वाढल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी अनेक मोठे पाऊल टाकण्याचे ठरवले आहे.

बिग बॉस १३ च्या लोकेशनची माहिती आधीच समोर आली आहे. आता शोचा सेट लोणावळ्यातून शिफ्ट करत गोरेगाव मध्ये करण्यात आला आहे. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. मागील वर्षाचा सीजन फ्लॉप झाल्यानंतर मेकर्स आता या शोमध्ये कामनर्सची एन्ट्री बंद करणार आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, सीजन 10 पासून कामनर्सची कन्सेप्ट शो ला जोडली गेली. सुरुवातीच्या काळात हे खूप चांगलं पसंत केलं गेलं. परंतु हळूहळू मात्र कॉमनर्स कंटेस्टेंटला शोमध्ये कंट्रोल करणं अवघड होत गेलं. परंतु या गोष्टीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तुम्हाला सांगू इच्छितो की, बिग बॉस 12 च्या सीजनची टीव्ही अ‍ॅक्ट्रेस दीपिका कक्कड ही विनर आहे. तर क्रिकेटर श्रीसंत फर्स्ट रनर अप झाला होता.