‘Bigg Boss’ नंतर उघडलं आसिम रियाजचं ‘नशीब’, सुहाना शाहरुख खानसोबत करणार ‘सिनेमा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा फिनाले नुकताच पार पडला आहे. यातील स्पर्धक आसिम रियाज याचा प्रवास खूपच रोमांचक राहिला आहे. त्यानं चाहत्यांचं खूपच मनोरंजन केलं आहे. फिनालेपर्यंत लोकांना आशा होती की, तोच बिग बॉसचा विनर होईल. परंतु शेवटी सारा डाव पलटला. ट्रॉफी जिंकणारा सिद्धार्थ शुक्लादेखील काही कमी स्ट्राँग नव्हता. शो संपल्यानंतर सर्वजण आपल्या पर्नसनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बिजी झाले आहेत. पारस छाबडा आणि शहनाज गिल सध्या एक टीव्ही शो करत आहेत. अशी माहिती आहे की, करण जोहर आपल्या एका आगामी सिनेमात आसिम रियाजला लाँच करणार आहे. या सिनेमात आसिम रियाजसोबत बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खानही दिसणार आहे. असं असलं तरी अद्याप या गोष्टीची पुष्टी मात्र झालेली नाही.

View this post on Instagram

Meri Rani❤️ @iamhimanshikhurana

A post shared by Asim Riaz (@asimriaz77.official) on

समोर आलेल्या माहितीनंतर आता चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. परंतु खरंच सुहाना आणि आसिम रियाज एकत्र काम करताना दिसतात की नाही हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

View this post on Instagram

🙂

A post shared by Asim Riaz (@asimriaz77.official) on

दरम्यान बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो फिक्स आहे किंवा नाही याबाबत आसिमनं स्पष्टीकरण दिलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आसिम म्हणाला होता, “असं काहीही नाही. काहीही फिक्स नाही. प्रेक्षकांच्या प्रेमामुळं मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि तो (सिद्धार्थ शुक्ला) जिंकला आहे. म्हणून फिक्स असं काहीच नाही. जे आहे ते समोर आहे. त्यामुळे फिक्स असण्याचा काही प्रश्न नाही.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like