बनावट ‘Dadasaheb Phalke Award’च्या वादावर माहिरा शर्माचा मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 ची स्पर्धक माहिरा शर्मा गेल्या काही दिवसांपासून दादासाहेब फाळके पुरस्काराचं बनावट सर्टीफिकेट बनवण्याला घेऊन चर्चेत आहे. अलीकडेच माहिरानं सोशलवर एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिनं चाहत्यांना सांगितलं होतं की, तिला मोस्ट फॅशनेबल कंटेस्टेंट ऑफ बिग बॉस 13 साठी गौरवण्यात आलं आहे. यानंतर माहिराचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसला. जेव्हा दादासाहेब फाळकेच्या टीमला याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी हे सर्टीफिकेट खोटं असल्याचं सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

https://www.instagram.com/p/B88vYiFF1eX/?utm_source=ig_embed

अनेक दिवसांपासून या प्रकरणी माहिरा चर्चेत आहे. माहिराबद्दल किती काय काय बोललं जाताना दिसत आहे. परंतु यावर माहिरानं काहीच स्पष्टीकरण दिलं नव्हतं. अखेर तिनं या बनावट सर्टीफिकेटला घेऊन आता खुलासा केला आहे. माहिरा सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे की, “माझ्यावर जे कोणते आरोप होत आहेत त्यात काहीही तथ्य नाही. हे सारे आरोप निराधार आणि खोटे आहेत.” असं तिनं सांगितलं आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार टीमनं माहिरा शर्माबद्दल बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की, “टीम मेंबरनं माहिराला कोणतंही सर्टीफिकेट दिलेलं नाही. तिनं बनावट सर्टीफिकेट दाखवत चाहत्यांची दिशाभूल केली आहे. माहिराच्या या कृत्याबद्दल लवकरच तिला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. तिला जाहीर माफी मागण्यासाठीही सांगितलं जाईल. तिला दोन दिवसांचा वेळ दिला जाईल की, तिनं आपली चूक कबुल करावी आणि जाहीर माफी मागावी.”

https://www.instagram.com/p/B39QWwJlZAj/

https://www.instagram.com/p/B0xcdaqALfU/