बिग बॉस 13 चा स्पर्धक ‘प्लेबॉय’ पारस छाबडा ‘या’ हाॅट अ‍ॅक्ट्रेसला करतोय डेट !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा स्पर्धक पारस छाबडा शोच्या सुरुवातीपासूनच चर्चेत येताना दिसत आहे. कधी कोणाशी भांडल्यामुळे तर कधी कोणाशी फ्लर्ट करण्यामुळे तो चर्चेचा हिस्सा बनलेला असतो. अनेकांना माहिती नसेल परंतु पारस एका टीव्ही अ‍ॅक्ट्रेसला डेट करत आहे.

पारस टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आकांक्षा पुरीला डेट करत आहे. तो अनेकदा आपले रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बिग बॉसमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांना पारसच्या लव्ह पार्टनरबाबत खूपच उत्सुकता आहे.

https://www.instagram.com/p/BzxkXSnFXX0/

बिग बॉस मध्ये शहनाज आणि माहिरा पारसच्या अटेंशनसाठी खूप कष्ट घेत आहे. एका मुलाखतीत आकांक्षा म्हणाली की, ती शोमधील हा लव्ह ट्रॅंगल एन्जॉय करत आहे.

https://www.instagram.com/p/BzFLKgFlTK6/

पारसने गर्लफ्रेंड आकांक्षाच्या नावाचा टॅटू बनवला होता. आकांक्षाने याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. आपले अनेक हॉट फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/Byz7gSNlgX9/

आकांक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मॉडेल आणि अ‍ॅक्टर आकांक्षा पुरीने मधुर भांडारकर यांच्या कॅलेंडर गर्ल्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. परंतु अद्याप बॉलिवूडमध्ये तिने आपली खास जागा बनवली नाही. आकांक्षा मल्याळम आणि तेलगू सिनेमात झळकत असते. सध्या ती विघ्नहर्ता गणेश या मालिकेत काम करत आहे.

https://www.instagram.com/p/BxCEgjuFu9q/

https://www.instagram.com/p/BvABTzYHPVA/

https://www.instagram.com/p/BudpW_xHNYd/

Visit : Policenama.com