‘बिग बॉस’ फेम रश्मी देसाई फेरीवाल्याकडून भाजी खरेदी करताना दिसली ! ‘असं’ केलं ‘बार्गेनिंग’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 या मालिकेची अभिनेत्री रश्मी देसाई सध्या खूपच चर्चेत येताना दिसत आहे. अलीकडेच तिचा कोरोनाच्या भीतीनं टेम्परेचर चेक करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती भाजी खरेदी करत आहे आणि भाजीवाल्यासोबत सौदेबाजी करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B99ifnQJdeM/

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास सारं काही बंद आहे. फक्त काही किराणा दुकानं आणि आवश्यक गोष्टी सुरू आहेत. अशात रश्मी देसाई स्वत: भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती.

https://www.instagram.com/p/B9_RwAtpA79/

व्हिडीओत दिसत आहे की, रश्मी बटाटे आणि टोमॅटो खरेदी करत आहे परंतु यावेळी ती बार्गेनिंग करत आहे. रश्मीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती खूपच साध्या लुकमध्ये होती. तरीही रश्मी नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. रश्मीनं ऑरेंज कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. खास बात म्हणजे कोरोनापासून वाचण्याची खबरदारी म्हणून तिनं मास्कही घातलं होतं. रश्मीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नजर 4 मालिकेत काम करताना दिसत आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत आहे. रश्मीनं जास्मीन भसीनला रिप्लेस केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9-q_PTJbwD/

https://www.instagram.com/p/B9gpjk-AT8o/

https://www.instagram.com/p/B9eHjSFgRsZ/