‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर हॉलिडे ‘एन्जॉय’ करणारी स्पर्धक ‘ट्रोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 ची सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त स्पर्धक मधुरीमा तुली शोमधून बाहेर पडल्यानंतर हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे. मधुरीमानं व्हॅकेशनवरील तिचे काही एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या फोटोंमुळे मधुरीमा चर्चेत आली आहे. काहींनी मधुरीमाला ट्रोलही केलं आहे. काहींनी कमेंट करत विचारलं की, एकटीच फिरतेस का ? अनेकांच्या असं विचारण्याचा रोख असा होता की, विशाल आदित्य कुठे आहे ज्याच्यासोबत बिग बॉसच्या घरात ती खूप क्लोज होती.

बिग बॉसच्या घरात विशाल आदित्य सोबतच्या लव हेट रिलेशनमुळे मधुरीमा अनेकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. दोघे अनेकदा भांडणं करताना दिसले आहेत. एका क्षणाला दोघे भांडायचे आणि दुसऱ्याच क्षणी ते जवळ येताना दिसायचे. त्यांच्या अशा वागण्यानं चाहतेही अनेकदा कन्फ्युज झाले आहेत.

मधुरीमा विशालला कधी चपलेनं मारायची तर कधी फ्राय पॅननं मारताना दिसायची. ज्यानंतर सलमान खाननं तिला शोमधून बाहेर काढलं होतं. शोमधून बाहेर पडल्यानंतर मधुरीमानं विशालबद्दल अनेक मोठे खुलासे केले होते. मधुरीमानं सांगितलं की, विशालं रिलेशनशिपमध्ये असताना तिला अनेकदा मारहाण केली आहे. पंरतु प्रेमात असल्यानं तिनं कधी रिअॅक्ट नाही केलं.