Bigg Boss 13 : ‘सिद्धार्श शुक्लानं मला शिवीगाळ करत मारहाण केली’, शिल्पा शिंदेचे खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसच्या फिनालेला काही तास शिल्लक राहिले आहेत. सर्वजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करताना दिसत आहेत. सिद्धार्थ शुक्ला या सीजनच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. असं असतानाच आता बिग बॉस 11 ची विनर शिल्पा शिंदेनं सिद्धार्थवर खळबळजनक आरोप केले आहेत. याचा परिणाम सिद्धार्थच्या वोटींगवर होऊन आता शोची गणितं बदलू शकतात. या आरोपांमुळं आता नवा वाद सुरू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि शिल्पाची एक ऑडियो क्लिप समोर आली होती. यात शिल्पा शिंदेचा आवाज क्लियर येत नव्हता. परंतु सिद्धार्थ तिला विचारत होता की, तुला माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहायचं की नाही. यानंतर शिल्पानं एका मुलाखतीत बोलताना सिद्धार्थसोबत रिलेशनशिप असल्याचं मान्य केलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिल्पा शिंदे म्हणाली, “होय, मी सिद्धार्थसोबत रिलेशनमध्ये होते. परंतु तो अनेकदा लहान लहान गोष्टींवरून नाराज होत असे. रागाच्या भरात त्यानं शिवीगाळही केली आहे. इतकेच नाही तर मला त्यानं मारहाणही केली आहे. तो खूप पजेसिव होता त्यामुळेच तो मला नेहमी मारहाण करायचा.”

पुढे बोलताना शिल्पा म्हणाली, “सिद्धार्थ या सीनजचा विनर व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. त्याच्यासारख्या व्यक्तीनं हा शो जिंकणं यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. माझ्या मते आसिम ट्रॉफीचा खरा मानकरी आहे.”

You might also like