Bigg Boss 13 : आसिम रियाजची फॅमिली फिनालेसाठी ‘रेडी’, मिळणार का BB ची ‘ट्रॉफी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. देश परदेशातून लोक आसिम रियाजला सपोर्ट करताना दिसत आहेत. अशातच आता आसिमची फॅमिलीही त्याला सपोर्ट करण्यासाठी आली आहे. आसिमचा भाऊ उमर रियाजनं या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला सांगितलं आहे की पूर्ण फॅमिली तुझ्यासोबत आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आसिमची फॅमिली आली आहे. उमरनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “बिग बॉस ग्रँड फिनालेमध्ये फॅमिली रियुनियन. मॉम डॅड. सलमान खाननं होस्ट केलेली संध्याकाळ शानदार होती. माझ्या आतापर्यंतच्या सर्वात सुंदर शोपैकी एक. बिग बॉस 13 ची ट्रॉफी बेस्ट मॅनला मिळावी.”

उमरनं शेअर केलेला फोटो आसिमसाठी खूप काही आहे. ग्रँड फिनालेसाठी काही तास शिल्लक असताना अशा प्रकारे कुटुंबाचा सपोर्ट मिळणं प्रत्येक स्पर्धकासाठी खूप मॅटर करतं.

उमर रियाजनं सुरुवातीपासूनच भाऊ आसिमला सपोर्ट केला आहे. तो आसिमच्या पर्नसल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल प्रामाणिक दिसला. त्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इमानदारीनं दिलं.

शोबद्दल बोलायचं झालं तर आसिम रियाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात विनरसाठी जबरदस्त टक्कर सुरू आहे. याशिवाय मुलींपैकी रश्मी देसाई आणि शहनाज गिल हेही या रेसमध्ये आहेत.

पारस छाबडा आणि आरती सिंह यांच्या घरातून बाहेर पडण्याच्या चर्चा आहेत. सध्या तरी याबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नाही. बिग बॉस 13 च्या फिनालेचा टाईम जवळ आला आहे. लोकांमध्येही आपल्या आवडत्या स्पर्धकाबद्दल धडधड वाढताना दिसत आहे. ग्रँड फिनाले शनिवारी रात्री 9 वाजता प्रसारीत केला जाणार आहे.

You might also like