Bigg Boss 13 : आरती सिंहच्या ‘रेप’बद्दल भाऊ कृष्णा अभिषेकचा मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा विनर कोण होतं हे आज रात्री फायनल होणार आहे. सिद्धार्थ शुक्ला, पारस छाबडा, रश्मी देसाई, शहनाज गिल, आरती सिंह, आसिम रियाज असे घरात फक्त 6 स्पर्धक आहेत. या शोमध्ये अनेकांचे सिक्रेट रिवील होताना दिसले. नुकतंच आरती सिंहनं सांगितलं होतं की, 13 वर्षांची असताना तिच्यासोबत रेपचा प्रयत्न झाला होता. फिनालेच्या आधी आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेकनं याचा खुलासा केला आहे. त्यावेळी भावनेच्या भरात आरती जास्त बोलून गेली असं तो म्हणाला आहे.

एका वेबसाईटसोबत बोलताना आरती सिंहचा भाऊ कृष्णा अभिषेक म्हणाला की, “ही गोष्ट आमच्यासाठी शॉकिंग होती. मला वाटतं की आरती भावनेच्या भरात जास्त बोलून गेली. तिच्यावर कोणी रेप करण्याचा प्रयत्न नव्हता केला. असं काही होणार होतं परंतु तो पळून गेला. आंटीनं सांगितलं आहे की, लखनऊमध्ये त्याच्याविरोधात FIR दाखल झाली होती. परंतु त्याला पकडण्याआधीच तो पळून गेला. आरती भावनेच्या भरात जरा जास्तच बोलून गेली.”

आरती म्हणाली होती की, “मी पळून जाण्याच प्रयत्न केला परंतु त्यानं मला पकडून ठेवलं होतं. त्यानं दारं खिडक्या बंद केली होती. मी बचाव करण्यासाठी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. तेव्हापासून मला पॅनिक अ‍ॅटॅक येत आहेत.” असंही तिनं सांगितलं होतं.

You might also like