Bigg Boss 13 : स्क्रिनवर कोएना मित्राला पाहून भडकले प्रेक्षक, ती म्हणाली – ‘माझी मर्जी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 ला नुकतीच सुरुवात झाली आहे. घरातील सदस्यांमध्येही वाद होताना दिसत आहेत. एकूण स्पर्धकांची जिंकण्यासाठी आणि शोची टीआरपीसाठी कवायत सुरु झाली आहे. सध्या टास्कवरून स्पर्धकांमध्ये वाद होत आहेत. अशातच शोमधील स्पर्धक कोएना मित्रा टोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. जेव्हा ती स्क्रिनवर येते तेव्हा लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

कोएनाने आपलं नाक सुरेख करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. परंतु त्याचा परिणाम उलटच झाला. कोएनाची सर्जरी कोणाला आवडली नाही असे दिसत आहे. जेव्हा लोक तिला सोशल मीडियावर पाहतात तेव्हा वाईट शब्दात कमेंट करत असतात. कोणी तिला म्हणतं कोएना तू सर्जरीचं दुकान आहेस. कोणी तिला असंही म्हणतं की, तुझ्या चेहऱ्यासोबत तुझा आवाजही बदलला आहे. ट्विटरवर तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

कोएना जरी ट्रोल होत असली तरी अनेकदा तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळीही ती म्हणाली आहे की, माझी मर्जी आहे. मला जे हवं ते मी करेन.” एका मुलाखतीत तिने सर्जरी करणं तिची चूक होती असं तिने मान्यही केलं होतं. कोएना म्हणाली होती की, “जोपर्यंत आपण काही गोष्टींचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की, काय चूक आहे आणि काय बरोबर आहे.”

https://twitter.com/halfpsychh/status/1178368620524531712

https://twitter.com/halfpsychh/status/1178374121064779776

https://twitter.com/do_not_check/status/1178367502813843456

https://www.instagram.com/p/BxyRwQyB5fu/

https://www.instagram.com/p/B127tJCBqN6/

https://www.instagram.com/p/B0i45V_BpBB/

https://www.instagram.com/p/Bx6h7ldhu2f/

https://www.instagram.com/p/BwcMcaJA_AY/